Vasai Bhondubaba: “गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!”; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया

वसई  : लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या ऋषिकेश वैद्य याने सोशल मीडियावर पोस्ट (vasai Crime news) करत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच सत्य बाहेर येईल. सत्यमेव जयते,” अशा आशयाचे वक्तव्य त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केले आहे.(vasai Crime news)

गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात पोलिसांकडून (vasai Crime news) आरोपीचा शोध सुरू असतानाच त्याची ही सोशल मीडिया पोस्ट समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला पीडित महिलेने केलेले गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूला आरोपीचा ‘खोटा गुन्हा’ असल्याचा दावा, यामुळे या प्रकरणातील सत्याबाबत (vasai Crime news) उत्सुकता वाढली आहे.दरम्यान, माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र तो अद्याप फरार असून, पुणे पोलिसांचे पथकही त्याच्या शोधासाठी कार्यरत आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे दावे तपासले जाणार आहेत.(vasai Crime news)

झिरो नंबरवर गुन्हा दाखल

पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही. (vasai Crime news)

बुधवारी रात्री ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांना तो सापडला नसल्याने आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे पोलिसांचे पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे.(vasai Crime news)

मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती….

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ऋषिकेश वैद्य याने २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ सांगत आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात भेटीत लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने सांगितले असून त्यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.(vasai Crime news)

आरोपी ऋषिकेश वैद्य याने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाहीत, तर पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी धर्माचा आणि अध्यात्माचा आधार घेतला. स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांची दिशाभूल करण्याचा त्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे, गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. या पुराव्यांच्या जोरावर तो २०२५ पर्यंत तिला ब्लॅकमेल करत राहिला. सध्या आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्याची मागणी होत आहे. तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.