प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केले अन् संतापलेल्या प्रेयसीने मैत्रिणींसह थेट घरी घ
मुंबई: प्रियकराने आपल्या मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणीने धक्कादायक (Mumbai Crime News) कृत्य केले आहे. आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने या तरुणीने पीडितेच्या घरात घुसून तिचे केस कापले (Mumbai Crime News) आणि या संपूर्ण प्रकाराचे ‘हेअर, नो हेअर’ म्हणत चित्रीकरण केले. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या तीन मैत्रिणींवर २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai Crime News)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख काही काळापूर्वी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर इन्स्टाग्रामवरून पीडितेच्या संपर्कात होता. संवादादरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. इतकेच नाही तर, “मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे,” असे त्याने सांगितल्याने प्रेयसीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि ती प्रचंड चिडली.(Mumbai Crime News)
७ मार्च रोजी आरोपी तरुणीने पीडितेचा मोबाईल तपासला होता, पण तेव्हा तिला काहीही संशयास्पद आढळले नव्हते. मात्र, मनात राग धरून तिने २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी, असे वाटून पीडितेने दरवाजा उघडताच आरोपीने तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली.(Mumbai Crime News)
‘हेअर, नो हेअर’चा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
यावेळी आरोपीच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ केले. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. इतकेच नाही तर कापलेले काही केस सोबत घेऊन ती तिथून निघून गेली. पीडितेने केलेल्या आरडाओरड्यानंतर इमारतीतील नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाल्या होत्या.वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधांच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनाक्रम समोर
आरोपी तरुणी २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या दोन मैत्रिणींसह पीडितेच्या वर्सोवा येथील घरी पोहोचली. या तरुणीने बेल वाजवल्यानंतर पीडितेने आईस्क्रीम डिलिव्हरी आली असावी, असे वाटल्याने दरवाजा उघडला. तेव्हा आरोपी तरुणीने तिला बाहेर ओढून तिचे केस कापण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या बरोबर आलेल्या मैत्रिणींनी मोबाइलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
केस कापल्यानंतर आरोपीने ‘हेअर नो हेअर’ असे म्हणत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच काही केस सोबत घेऊन ती तेथून निघून गेली. या घटनेदरम्यान पीडितेने आरडाओरडा केला होता. आरोपी व तिच्या दोन मैत्रिणींनी इमारतीत विनापरवानगी प्रवेश करून हे कृत्य केलं.
प्रियकर व पीडित यांच्यात संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.