चाकणकरांशी तटकरांसोबत गुंतवणूक करणाऱ्या चौधरींची भागीदारी, असे म्हणतात, A=B=C हा काय संबंध?
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती एकामागून एक समोर येत आहेत. यादरम्यानच आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे फोटो दाखवले. त्याचबरोबर एमआयडीसीच्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री काय करत आहेत, तिथे सिन्नरमधील एमआयडीसीमध्ये शाळा बांधायची होती का? मग तिथे कसलं प्लॅनिंग सुरू आहे? अशा सवालही अंधारेंनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर पत्रकार परिषदेत शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर, तटकरे आणि चौधरी यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवरून गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. हे चौधरी नाव महत्त्वाचे आहे कारण ते तटकरे (अदिती तटकरे किंवा सुनील तटकरे यांच्या संदर्भात) यांच्यासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. यावरून अंधारे यांनी ‘ A=B=C यह रिश्ता क्या कहलाता है?’ असे समीकरण मांडले आहे. म्हणजे जर चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत, तर मग चाकणकर आणि तटकरे यांच्यात काय संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
चाकणकरांना महिलांचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, पण सिन्नरमधील एमआयडीसीमध्ये काय करत होत्या, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री तिथे काय करत होते, सिन्नरमधील एमआयडीसीमधील बडे अधिकारी त्यांना इतकं काय समजावून सांगत होते, सिन्नरमधील एमआयडीसीमधील काही फोटो देखील यावेळी अंधारेंनी दाखवले, त्याचबरोबर या दोघांचाही या सिन्नरमधील एमआयडीसीशी काय संबंध आहे, ते इथे कशाला आले होते? असे सवालही फोटो दाखवत अंधारेंनी उपस्थित केले आहेत.
४५० ते ५०० कोटींचा प्रोजेक्ट
निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा हा प्रकल्प तब्बल ४५० ते ५०० कोटी रुपयांचा असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. इतकी मोठी आर्थिक कुवत या लोकांकडे आली कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.