नरहरी झिरवळांच्या कथित व्हिडीओवर काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी पत्ते खोलले, म्हणाले…

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासंबंधी व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओवर (Narhari Zirwal Video) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा दोन तीन व्हिडीओ एकत्रित जोडून तयार केल्याचा दावा झिरवळांनी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्या व्हिडीओची शाहनिशा केली जाईल, सत्यता तपासली जाईल आणि मग निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीतील एका गटाने तशी मागणी केल्याची माहिती आहे. तर शिवसनेच्या नेत्यांनीही झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती आहे.

Narhari Zirwal Viral Video : सत्यता तपासली जाणार

खरात प्रकरणानंतर राज्यातील एका मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावरुन आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, “नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितलं की, तो व्हिडीओ दोन-चार व्हिडीओ एकत्रित जोडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर या विषयी तात्काळ तक्रार दाखल करा, या व्हिडीओची शाहनिशा करण्यात येईल असा आपण सल्ला दिला.”

एफडीए विभागातील लाचखोरी प्रकरणामुळे झिरवाळ या आधी अडचणीत आले होते. त्या प्रकरणात नरहरी झिरवाळांचा कोणताही हात नसल्याचं अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर नरहरी झिरवाळ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

आता जी घटना समोर आली आहे ती गंभीर आहे. त्याची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

नरहरी झिरवाळ बातम्या : झिरवाळांचा व्हिडीओ व्हायरल

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानचा असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामध्ये एक महिलाही दिसत आहे. तसेच दारूच्या बाटल्याही दिसत आहेत.

दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी राष्ट्रवादी पक्ष राजीनामा घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोप झाले की लगेच राजीनामा घेणं योग्य नसल्याची वरिष्ठांची भूमिका असल्याची माहिती आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.