पुण्यात ACB ची मोठी कारवाई, दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहात पकडलं
गुन्हे बातम्या ठेवा: पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एसीबीनं मोठी कारवाई केली आहे. थेट प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गोविंद शिंदे असं या लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून ते जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बिल्डिंग कंपलीशन सर्टिफिकेट देण्यासाठी शिंदेंनी लाच मागितली होती. ती दोन लाखांची लाच स्वीकारताना आज शिंदेंना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दुपारी तीन वाजता एसीबीने त्यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला होता, ज्यात शिंदे अडकले. एसीबीची पुढील कारवाई सुरु असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, थेट प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
आणखी वाचा
Comments are closed.