न्यायालयात 20 ते 25 वर्षे खटले चालतात, माझ्या कार्यालयात एकच तारीख होते, गायकवाडांचं वक्तव्य
संजय गायकवाड : न्यायालयात 20 ते 25 वर्षे खटले चालतात, पण माझ्या कार्यालयात फक्त एकच तारीख होते. त्याच दिवशी अर्ग्युमेंट त्याच दिवशी जजमेंट आणि खतम. लगेच न्याय निवाडा होतो असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. नाहीतर मग आमचा धर्मवीर आखाडा आहेच. आमच्या स्टाईलने संसार बसवतो. असे संजय गायकवाड म्हणाले.
बुलढाण्यातील चिखली मतदारसंघातील विविध गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी संजय गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या 35 कोटी रुपयांच्या कमिशनच्या बाबतीत स्पष्टोक्ती दिली आहे. मी खरं बोलतो पत्रकारांना बोलावच लागतं. पण खरंच मी ते केलं आहे. यामुळं पुन्हा एकदा माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला असं म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी 35 कोटी रुपयांच कमिशन माफ केल्याबद्दल पून्हा कबुली दिली आहे का? असा सवाल उपस्थित राहत आहे. शिवाय गायकवाड म्हणाले की, माझ्याकडे कौटुंबिक वाद अनेक येतात पण माझ्याकडे तात्काळ न्याय निवाडा होतो. न्यायालयात 20 ते 25 वर्ष खटले चालतात मात्र माझ्या कार्यालयात एकच तारीख होते. त्याच दिवशी आर्ग्युमेंट आणि त्याच दिवशी जजमेंट आणि किस्सा खतम. नाहीतर मग आमचा धर्मवीर आखाडा आहेच आमच्या स्टाईलने संसार बसवतो असे गायकवाड म्हणाले. इतर नेते हे बुवाबाजीत पैसे गमावतात. मात्र, मी जनतेला मदत करतो. मी कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो असं वक्तव्यही संजय गायकवाड यांनी केलं.
35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी दिल्याच्या वक्तव्यामुळं गायकवाड चर्चेत
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा वादग्रस्त कृतींमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बुलढाण्यातील (Buldhana) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना ताकद देण्याबाबत भाषण करताना त्यांनी चक्क आपलं कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटल्याचं म्हटलं. त्यामुळेच, आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता आज फॉर्च्यूनर कारमध्ये फिरतोय, असेही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे माझं 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी दिल्याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि कमिशनचा मुद्दा समोर आला आहे. शिवसेना आता सत्तरीच्या वर्षाकडे जात आहे, चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षा मजबूत होता. हळू हळू येथील कार्यकर्ता भाजपसोबत गेला. येथील रेखाताईंच्या तीन टर्म आमदारकीमध्ये सामान्य माणसाला कधीच त्रास झाला नाही. पण, आताच्या काळात.. मी पण आमदार आहे, महाराष्ट्रातील ताकदवर आमदार आहे. मी कशाला कधीच घाबरत नाही. आमची ताकद सामान्य माणसांना पाठिंबा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरतो असे ते म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.