नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमक

गुन्हा ठेवा: पुण्यातील (Pune) गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून 41 वर्षीय आदित्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवली परिसरातील रहिवासी असून, सध्या पुण्यातील भोसले नगर येथे वास्तव्यास होते. नोकरी गमावल्यानंतर ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत एफसी रोडवरील खाऊ गल्लीत स्वतःच्या हाताने गळ्यावर ब्लेडने वार केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Pune Crime: आदित्य सातपुते यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून सातपुते यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणावर क्रूर हल्ला

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक आणि क्रूर हल्ल्याची घटना घडली. 32 वर्षीय सीताराम आसाराम आळंजकर या तरुणाला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य करत निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी फाट्याजवळील एका शाळेजवळून हल्लेखोरांनी सीताराम यांना जबरदस्तीने रस्त्यालगतच्या निर्जन शेतात नेले. तेथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या. हल्ल्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतच सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सीताराम बराच वेळ घटनास्थळी विव्हळत पडून होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीताराम यांना रात्री साडेआठ वाजता गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

‘तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही’; माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

आणखी वाचा

Comments are closed.