अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात

अशोक खरात: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिकमधील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने खरात याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. त्यामुळे अशोक खरात याचा मुक्काम 1 एप्रिलपर्यंत तुरुंगातच असेल. आजच्या सुनावणीवेळी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी अशोक खरातची पोलीस कोठडी किती महत्त्वाची आहे, हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Nashik Crime news)

या सुनावणीत सरकारी वकिलांनी एक महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली. त्यांनी सांगितले की, अशोक खरात हा चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नाही. महिलांच्या अत्याचाराचा विषय निघताच तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यामुळे तपास अपूर्ण असून तो पूर्ण करण्यासाठी अशोक खरात याची पोलीस कोठडी वाढवून हवी. तसेच अशोक खरात याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरु आहे. आम्ही या मोबाईल डेटाची क्लोन कॉपी घेतली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत माहिती मिळवण्यासाठी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून हवी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

Nashik news: न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवून दिली?

* भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही म्हणून लागणारा अधिकचा वेळ.
* अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे त्याची समक्ष चौकशी करायची आहे.
* महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ही खाल्ल-पिल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत डोके जड व्हायचे आणि भोंदू अशोक खरात सांगायचा तसे ह्या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही त्याचा तपास करायचा आहे.
* अशोक खरात ने भोंदूगिरी करत किती आणि कोठे कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली खरेदी केली याचा तपास करायचा आहे.
* अशोक खरात याने जे कृत्य केले जे गंभीर गुन्हे केले यात खराताला कोणी मदत केली आहे. का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
* महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.

आणखी वाचा

अशोक खरातचा आर्मी ग्रेड फोन, डेटा सुरक्षित ठेवायला खास तंत्रज्ञान, लॉक उघडणं सहज शक्य नाही; दत्तात्रय खेमनारांचा सनसनाटी गौप्यस्फोट

आणखी वाचा

Comments are closed.