MS धोनी, डेवाल्ड ब्रेविस OUT…; राजस्थानविरुद्ध अशी असेल चेन्नईची Playing XI

IPL 2026 CSK VS RR: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात तिसरा सामना रंगणार आहे. गुवाहाटी मैदानावर चेन्नई आणि राजस्थान यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता सामना खेळण्यात येईल. (CSK VS RR) आजच्या या सामन्यात राजस्थानकडून खेळणाऱ्या रविंद्र जडेजा आणि चेन्नईकडून खेळणाऱ्या संजू सॅमसनकडे सगळ्यांची नजर असणार आहे.

चेन्नईला धक्का, धोनी आणि ब्रेविसला दुखापत- (MS Dhoni And Dewald Brevis)

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने जाहीर केले होते की, महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) पोटरीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. परिणामी, तो खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. धोनी किती सामन्यांसाठी संघाबाहेर राहील हे सीएसकेने स्पष्ट केले नव्हते. आता, टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, एमएस धोनी जास्तीत जास्त सहा सामन्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो. तो लवकर बरा झाल्यास, चार सामन्यांनंतर मैदानावर परत येऊ शकतो. मात्र, धोनीला पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील आणि 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यताही अजून अनिश्चित आहे. तर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) देखील काही सामने बाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रेविस सध्या साइड स्ट्रेनच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो सुरुवातीचे दोन-तीन सामने गमावू शकतो, अशी माहिती आहे.

राजस्थानविरुद्ध अशी असेल चेन्नईची प्लेइंग इलेव्हन- (CSK Playing XI Against RR)

ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, आयुष म्हात्रे, सरफराज खान/मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, अकेल होसेन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्ज संघ – (IPL 2026 CSK पूर्ण संघ)

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, राष्ट्रीय चौधरी, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स, प्रशांत वीर.

संबंधित बातमी:

MI beat KKR IPL 2026 : मुंबईचा वानखेडेवर धमाका! 14 वर्षानंतर पहिल्यांदाच विजयी सलामी, रोहित शर्मा आणि रिकल्टनच्या तडाखेबंद खेळीने यश साजरं

आणखी वाचा

Comments are closed.