स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार; भोंदू ऋषिकेश वैद्यचे पाय आणखी खोलात
पुणे गुन्हे ऋषिकेश वैद्य: स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील (Pune Crime) एका पिडीत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya) याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वसईत आरोपी, पिडीतेचा पती आणि ‘आमची वसई’ या संस्थेच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाणीची (Pune Crime News) घटना घडल्याचे समोर आले आहे.
Pune Crime News: मागील दोन वर्षांपासून पिडीतेशी फोन व मेसेज द्वारे संपर्क, संतप्त पिडीतेच्या पतीने केली मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी वसईतील हयात बंगल्याजवळ ही बैठक झाली होती. आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील दोन वर्षांपासून पिडीतेशी फोन व मेसेज द्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पिडीतेचा पती संतप्त होता. या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि पिडीतेच्या पतीने संतापाच्या भरात आरोपीवर धाव घेतली. या वेळी उपस्थित असलेल्या ‘आमची वसई’ संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त पिडीतेच्या पतीने त्यांनाही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
Crime News: वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यानया घटनेनंतर अश्विन ठठेरा यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे वसई पोलिसांनी पिडीतेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 351(2) आणि 352 नुसार एन.सी. (नॉन-कॉग्निझेबल) गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याला समज देण्यात आली होती. दरम्यान, भोंदू बाबाच्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असल्याने या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले असून, पोलिस तपास सुरू आहे.
नेमके प्रकरण काय? Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची सुरुवात वसई येथे झाली होती. तेथील गुन्हा पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला ताब्यात घेतले.तो एका गाडीतून प्रवास करत त्यांच्या नातेवाईकांकडे पुण्यामध्ये येण्यासाठी निघाला होता त्याचवेळी पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे..उद्या दुपारी ऋषिकेश वैद्य याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुणे पोलिसांच्या तीन ते चार टीम त्याचा शोध घेत होते अखेर काही वेळापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली आहे..
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचा आरोपी बाबाशी पहिला संपर्क 2023 मध्ये फेसबुकद्वारे झाला.त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आरोपी त्या महिलेला भेटण्यासाठी पुण्यात गेला होता. त्याने आपण महादेवाचा अवतार असून ती त्याची ‘पार्वती’ असल्याचा दावा केला होता. पिडीत महिलेच्या आरोपानुसार,आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये घेऊन गेला, तिला काही मादक पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने त्या महिलेचे फोटोही काढले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला. आता ऋषिकेश वैद्य या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.