रुपाली चाकणकर 24 तास उलटूनही गैरहजर; SIT ने चौकशीचा अँगल बदलला, अशोक खरात प्रकरणात अडचणीत भर

Rupali Chakankar Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्यासोबतची ओळख रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासह शिवनिका संस्थानच्या (Shivnika Sansthan) आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर देण्यात येणार आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीवर भर असून मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येत आहे. एसआयटीच्या तपासात महत्वाची हाती येण्याची शक्यता आहे.

24 तास उलटूनही रुपाली चाकणकर चौकशीसाठी एसआयटी समोर हजर झालेल्या नाहीत- (Rupali Chakankar Ashok Kharat Case)

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना खरात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आयटीकडून समन्स बजावण्यात आलंय. मात्र 24 तास उलटून गेल्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी एसआयटी समोर हजर झालेल्या नाहीत. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना अशोक खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का? याची चौकशी एसआयटीला करायची आहे. मात्र रुपाली चाकणकरांकडून एसआयटीच्या समन्सला कोणताच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे रुपाली चाकणकर एसआयटीसमोर चौकशीसाठी नाशिकला हजर राहणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

नव्या माहितीने रुपाली चाकणकरांची अडचण आणखी वाढली- (Rupali Chakankar Ashok Kharat Case)

महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशोक खरात सांगण्यावरून शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महिला आयोगाने सुनावणी ठेवली होती. पीडितेने नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना देण्यात नोटीस आली होती. 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीच पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

योग्यवेळी सर्वांना नेमकी माहिती देण्यात येईल- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Rupali Chakankar)

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी- (Ashok kharat Case)

स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

आणखी वाचा

Comments are closed.