संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्…; विरारमधील ‘त्या’ घटनेच

फ्लिप गुन्हे बातम्या: चारित्र्याच्या संशयातून एका 26 वर्षीय पतीने आपल्या 22 वर्षीय पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. वज्रेश्वरी जवळील शिरवली गावच्या शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर, विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने तपास करत पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

Virar Crime News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी शिरवली गावाजवळील एका निर्जन शेतात 25 ते 30 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोशन यादव (26) आणि त्याचा मित्र भानुप्रताप यादव (30) यांना ताब्यात घेतले.

Virar Crime News: दगडाने ठेचून संपवले

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. मृत महिलेचे नाव मधुबाला उर्फ प्रियाकुमारी यादव (22) असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी होती. रोशनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यातून त्यांच्यात सतत वाद होत असत. 19 मार्च रोजी रोशनने आपला मित्र भानुप्रताप याच्या मदतीने मधुबालाला फिरवण्याच्या बहाण्याने वज्रेश्वरी येथील दुर्गम भागात नेले. त्यानंतर दोघांनी मिळून मधुबालावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचून तिची हत्या केली व मृतदेह तिथेच टाकून पसार झाले.

Virar Crime News: आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

वज्रेश्वरी सारख्या दुर्गम भागात पुरावे नसताना केवळ सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने हा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला…

Navi Mumbai Crime News: अशोक खरातनंतर नवी मुंबईचा ‘शास्त्रज्ञ’ आदर्श म्हात्रेचं भयानक कांड, महिलांसोबत नको ते कृत्य, दहावी पास पण सांगायचा मी डॉक्टर, सरकारी अधिकारी

आणखी वाचा

Comments are closed.