कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्त

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाच्या कक्षात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. अशोक खरातला न्यायाधीशांसमोर हजर करताच, न्यायमूर्तींनी त्याला एक प्रश्न विचारला. “तुमची काही तक्रार आहे का?” या प्रश्नावर खरातने केवळ एका शब्दात “नाही” असे उत्तर दिले. या उत्तराने सुनावणीची सुरुवात झाली असली, तरी त्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे मात्र अत्यंत खळबळजनक होते.

सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, अशोक खरात हा या संपूर्ण गुन्ह्याचा ‘मास्टरमाईंड’ आहे. तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपी तपासात सहकार्य करत नसून त्याच्या मोबाईलमधील अनेक गोष्टी कोडवर्डमध्ये आहेत. या कोडवर्डचा उलगडा करण्यासाठी आणि त्याला समोर बसवून चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी असाही आरोप केला की, खरात महिलांना काही विशिष्ट पाणी किंवा द्रव्य देत होता, त्यामागील सत्य शोधणे गरजेचे आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: राजकीय व्यक्तींची नावे ‘डमी’ स्वरूपात सेव्ह?

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे राजकीय कनेक्शन. खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जात असून, त्याने काही राजकीय व्यक्तींची नावे ‘डमी’ स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. दुसरीकडे, अशोक खरातच्या वकिलांनी वाढीव कोठडीला विरोध केला, परंतु पीडित महिलांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत जास्त कोठडीची मागणी केली.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरातची कोठडी वाढवण्याची प्रमुख कारणे

– भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. म्हणून लागणारा अधिकचा वेळ.

– अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे. त्याची समक्ष चौकशी करायची आहे.

– महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ते खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत त्यांचे डोके जड व्हायचे. यानंतर अशोक खरात सांगायचा तसे या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे? याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही, त्याचा तपास करायचा आहे.

– अशोक खरातने भोंदूगिरी करत किती आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली? याचा तपास करायचा आहे.

– अशोक खरात याने जे कृत्य केले त्यात त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

– महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे. तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरातला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरात पोलिसांना धड उत्तरं देईना, महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय-काय सांगितलं?

आणखी वाचा

Comments are closed.