IPLच्या दुसऱ्याच दिवशी राडा! अजिंक्य रहाणे भडकला, ऑस्ट्रेलियन बोर्डाला घाम फुटला, नेमकं काय घडल

अजिंक्य रहाणे कॅमेरून ग्रीन आयपीएल 2026 वर : आयपीएल 2026 (IPL 2026) सुरू होऊन अवघे दोनच दिवस झाले असताना स्पर्धेत नवा वाद पेटला आहे. 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI VS KKR) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर हा वाद उफाळून आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र, पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) गोलंदाजी न दिल्याबाबत रहाणेने केलेल्या वक्तव्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नाराजी व्यक्त करत त्याला अप्रत्यक्षपणे खोटं ठरवलं आहे.

अजिंक्य रहाणेने नेमकं काय म्हटलं? (Ajinkya Rahane KKR IPL 2026)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 221 धावांचा पाठलाग रोखताना केकेआरच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव होता. मात्र, संघाचा महागडा खेळाडू कॅमेरून ग्रीन याने एकही षटक टाकलं नाही. आयपीएल इतिहासातील सर्वाधिक किंमतीत (25.20 कोटी रुपये) खरेदी झालेल्या खेळाडूकडून गोलंदाजी न करून घेणं आश्चर्यकारक मानलं जात होतं. सामन्यानंतर याबाबत विचारलं असता रहाणे म्हणाला, “ग्रीनने गोलंदाजी का केली नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे विचारा.” या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया (Cricket Australia on Ajinkya Rahane KKR)

रहाणेच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने स्पष्ट केलं की, कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीबाबत केकेआरला आधीच माहिती देण्यात आली होती. सीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ग्रीनला पाठीच्या खालच्या भागात दुखापत आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या 10-12 दिवसांत तो गोलंदाजी करू शकणार नाही. सध्या तो भारतातच गोलंदाजीसाठी पुनरागमनाची तयारी करत आहे. याबाबत केकेआरला आधीच कळवण्यात आलं होतं.” या सगळ्या प्रकरणामुळे आता रहाणेच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आयपीएल 2026 च्या सुरुवातीलाच एक मोठा वाद समोर आला आहे.

हे ही वाचा –

PSL Ball-Tampering Row : कॅमेरा झूम झाला अन् चेंडू कुरतडताना फखर जमान रंगेहात पकडला;  PSLमध्ये बॉल टेम्परिंग, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.