चेन्नई आऊट, मुंबई-बेंगळुरू इन… आयपीएलमध्ये मोठी उलथापालथ? प्लेऑफपूर्वी शशांक सिंगची भाकरी
IPL 2026 प्लेऑफ अंदाज : आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये दोन दिवसांचा खेळ झाला असून स्पर्धेला सुरुवातीपासूनच रंग चढताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या दमदार भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला. 14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच आयपीएलचा सलामीचा सामना जिंकला.
शशांक सिंगची पुन्हा भविष्यवाणी (Shashank Singh IPL 2026 Playoff Predictions)
दरम्यान, आयपीएल 2026 संदर्भात शशांक सिंग (Shashank Singh) याने केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. एका खासगी मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांबाबत आपले मत मांडले.
शशांक सिंह म्हणाला की, “माझ्या मते यंदा पंजाब किंग्स नक्कीच प्लेऑफमध्ये पोहोचेल.” एवढंच नाही, तर त्याने मोठा दावा करत सांगितले की, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स यंदा आयपीएल ट्रॉफीही जिंकेल. त्याच्या मते रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूही पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. याशिवाय, त्याने तिसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्सची निवड केली. “मुंबई इंडियन्स यंदा प्लेऑफमध्ये जाणार,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
चेन्नई सुपर किंग्स बाहेर जाणार, तर… (IPL 2026 Playoff Predictions)
चौथ्या स्थानासाठी मात्र त्याने थोडा वेगळा अंदाज वर्तवला. चेन्नई सुपर किंग्स किंवा सनरायझर्स हैदराबादसारख्या मोठ्या संघांऐवजी त्याने लखनऊ सुपर जायंट्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यापैकी एक संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल असे म्हटले. “का माहित नाही, पण यंदा दिल्ली किंवा लखनऊ यापैकी एक संघ टॉप-4 मध्ये असेल,” असे तो म्हणाला.
फायनलबाबत विचारले असता शशांक सिंगने स्पष्टपणे सांगितले, “फायनलमध्ये कोणताही संघ पोहोचो, पण ट्रॉफी मात्र यंदा पंजाब किंग्सच जिंकेल.” गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात फायनल झाला होता, ज्यामध्ये आरसीबीने विजय मिळवत किताब जिंकला होता. यंदा मात्र शशांक सिंहच्या या धाडसी भविष्यवाणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंजाब किंग्सचा संघ-(IPL 2026 PBKS पूर्ण संघ)
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्ंधर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यनूर, बार्टचे, लोअर शेर, ओमशेर, लोअर शेर फर्ग्युसन, विजयकुमार. वैशाक, यश ठाकूर, विष्णू विनोद, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विशाल निषाद
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.