Iran US Israel War – दुबईजवळ कुवेतच्या तेलवाहू जहाजावर इराणचा हल्ला; समुद्रात तेल गळतीची भीती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात आखाती देश होरपळून निघाले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण जोरदार प्रत्युत्तर देत असून आखातातील अमेरिकन तळांवर निशाणा साधत आहेत. अशातच मंगळवारी दुबई बंदराच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या कुवेतच्या एका महाकाय तेलवाहू जहाजावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या मुख्य भागाचे नुकसान झाले असून मोठी आग लागली होती. दुबई प्रशासनाने ही आग विझवण्यात यश आल्याचे सांगितले असले तरी मोठ्या प्रमाणात तेल गळती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

इराणविरुद्धचे युद्ध कधी संपणार? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.