BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ; MI आणि KKR च्या सामन्यानंतर काय घ

BCCI ब्रँड कास्ट अभियंता मृत्यू IPL 2026: मुंबईच्या प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएलसाठी (IPL 2026) भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा खोलीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यान विल्यम लेग्नफोर्ड असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा ब्रिटिश नागरिक आहे. 24 मार्चपासून यान हे ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल हंगामाच्या निमित्ताने वास्तव्यास होते. नेमकं काय घडलं, याचा सध्या तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. (BCCI Brand Cast Engineer Death IPL 2026)

नेमकं काय घडलं? (BCCI brand cast engineer death आयपीएल 2026)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी यान विल्यम लेग्नफोर्ड वानखेडेवर उपस्थित होते. मुंबई आणि केकेआरचा सामना संपल्यानंतर यान विल्यम लेग्नफोर्ड हे त्यांच्या 2715 नंतर रुमवर आले होते. 30 मार्च रोजी रिसेपशनिस्टने त्यांच्या खोलीत फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचारी त्यांच्या रुमवर गेले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मास्टर चावीने रूम उघडली असता यान विल्यम लेग्नफोर्ड हे खाली पडलेले होते. याची माहिती ट्रायडन्ट हॉटेलच्या डॉक्टरांना दिली असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस सखोल तपास करत आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Ravindra Jadeja Emotional Video CSK VS RR IPL 2026: 2 विकेट्स पटकावल्या, बाउंड्री लाईनवर उभा राहिला; चाहत्यांच्या घोषणा आणि रविंद्र जडेजा रडला, काळीज चिरणारा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.