राष्ट्रवादीची ओबीसी अन् अल्पसंख्याक सेलच रद्द केली, तटकरे-प्रफुल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधान बदलाच्या वादात आता आणखी नवे तपशील समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे काही अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला अधिकच धार आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या नव्या संविधानात मोठे बदल करण्यात आले असून, पक्षाचा कणा मानले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण सात फ्रंटल सेलचा उल्लेख होता. मात्र नव्या संरचनेत केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या चारच सेलचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवेळी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या मिनिट्समध्ये हे बदल नोंदवण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनीही निवडणूक आयोगाला पत्र देत पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत या मुद्द्याला अधिकच राजकीय रंग दिला आहे. अजित पवार यांच्या पक्षातून तीन सेल वगळल्याबाबत शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.(Rohit Pawar)
पटेल तटकरे यांना राष्ट्रवादी हा पक्ष गुंडाळून भाजपमध्ये जायचं
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक सेल अफजल फारुख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या सेल वगळल्या, प्रत्येक समाजाचा आवाज उठवण्यासाठी या सेलची निर्मिती शरद पवार यांनी केली होती.जेव्हापासून अजित दादा गेले त्यानंतर प्रफुल पटेल, तटकरे यांचा खरा चेहरा पुढे येत आहे. याचा मी निषेध करतो. यांची नीती बदलली काय ? अल्पसंख्यक समाजासोबत हा अन्याय का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर सामाजिक न्याय सेलचे भीमराव हत्तीहंबीरे यांनी सांगितलं की, अजित दादांच्या निधना नंतर पटेल तटकरे यांना राष्ट्रवादी हा पक्ष गुंडाळून भाजपमध्ये जायचं आहे. हे चुकीचं आहे, याच उत्तर त्यांना द्यावं लागेल. अजित दादा पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत होते, पण पटेल तटकरे आता षडयंत्र करत आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. (Rohit Pawar)
भाजपच्या विचारधारेशी जवळीकता साधण्याचा प्रकार
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अल्पसंख्याक आणि ओबीसी सेल गायब केल्याचं समोर आलं आहे. काल माझ्या कानावर आलं आहे. पक्ष विभाजन झाल्यावर अजित पवार यांनी काळजी घेतली होती. भाजप सोबत जाऊन देखील शिव शाहू फुले आंबेडकर विचार जपला होता. अजित पवार गेल्यानंतर घटनेत बदल करण म्हणजे भाजपच्या विचारधारेशी जवळीकता साधण्याचा प्रकार आहे, सुनेत्रा पवार ह्या प्रमुख आहेत असं ते सांगतात मग त्यांनी घटनेत बदल का केला? त्यांचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना देण्याबाबत का निर्णय घेतला? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.