महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात… एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक

अशोक खरात गुन्हा: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सुरु असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आयपीएस तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून प्रत्येक दिवशी अशोक खरात (Ashok Kharat) याची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी सलग 13 व्या दिवशी अशोक खरात याची चौकशी सुरु झाली आहे. अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. यानंतर त्याला पुन्हा पोलीस कोठडीत (Police Custody) पाठवले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्या कोर्टात नेण्यापूर्वी अशोक खरात याच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. यादृष्टीने एसआयटीच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध (Contraceptive pills ) वापरत असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे. (Nashik Crime news)

या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच महिलांना संमोहित करण्यासाठीही अशोक खरात काही औषधांचा वापर करता होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे एसआयटीकडून बुधवारी न्यायालयात एखादी गंभीर बाब समोर आणली जाण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासून एसआयटी पथकाने पुन्हा एकदा चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी पोलिसांनी अशोक खरात हा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितले होते. महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा विषय निघाल्यावर अशोक खरात उडवाउडवीची उत्तरे देतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बुधवारी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. सध्या पोलिसांनी अशोक खरात याच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास सुरु आहे.

यामध्ये कॉल रेकॉर्डस आणि Whatsapp चॅटसचा समावेश आहे. त्यादृष्टीने अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरु आहे. अशोक खरात याच्या मोबाईल डेटावरुन पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. खरातने अनेक  राजकारण्यांचे मोबाईल नंबर कोर्डवर्डमध्ये सेव्ह केल्याची माहिती आहे. या सगळ्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आगामी काळात अशोक खरात याच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

आणखी वाचा

भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर…

आणखी वाचा

Comments are closed.