अत्याचाराच्या आरोपातून 15 दिवसांपूर्वी सुटला, पोलिसांनी पुन्हा प्रसिद्ध रिलस्टारच्या मुसक्या आव

ठाणे गुन्हे: डोंबिवलीतील दावडी परिसरात राहणाऱ्या कुख्यात रिल स्टार सुरेंद्र पाटील (Reelstar Surendra Patil) याच्या घरातून कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठा हत्यारांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 7 पिस्तूल, 371 काडतूस, तसेच तलवारी आणि चॉपर जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ही हत्यारे घरातील चपलांच्या स्टँडमध्ये लपवून ठेवण्यात आली होती, ही बाब समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ( Crime News)

रविवारी पहाटेच्या सुमारास क्राईम ब्रांचच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. त्यानंतर सुरेंद्र पाटीलला अटक करण्यात आली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा नेमका कुठून आणि कशासाठी आणला याचा तपास सुरू आहे. (Crime News)

अशोक खरातप्रमाणे महिलांशी संबंध?

या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस तपासात सुरेंद्र पाटील हा नाशिकच्या अशोक खरातप्रमाणेच अनेक महिलांशी संबंध ठेवत असल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुरेंद्र पाटील यापूर्वीही वादग्रस्त ठरला आहे. एका भामट्याने फसवल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने अनेक वादग्रस्त रिल्स तयार केल्या. मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून रिल बनवण्याचाही प्रकार त्याने केला होता.

15 दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटला आता..

त्याच्यावर इंस्टाग्रामवर मैत्री करून दोन तरुणींवर बलात्कार केल्याचे आरोपही आहेत. अवघ्या 15 दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटून आला होता. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल असून त्यात आर्म अॅक्टसह इतर कलमांचा समावेश आहे. 2023 साली त्याला एक वर्षासाठी तडीपारही करण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या या रिल स्टारचे अकाउंट बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. आता पुढील तपासात पोलिस आणखी काय खुलासे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Alka Yagnik: अलका याज्ञिक गंभीर आजाराशी देतेय झुंज, दुर्मिळ आजारामुळे गायिका त्रस्त; नेमका कोणता आजार झालाय?

आणखी वाचा

Comments are closed.