कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; अमोल मिटकरीही संतापले

अकोला क्राईम न्यूज : अकोल्यातील पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी (Akola Police) करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी खळबजनक दावा केलाय. राजेश जाधवच्या संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्यात. मात्र, त्याची तक्रार न झाल्यानेच त्याची हिम्मत वाढल्याचा आरोप डॉ. अशा मिरगे यांनी केलाय. यासोबतच दहा वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची तक्रार होती. त्या संदर्भतील तक्रार आपल्याकडे आली असल्याचा गौप्यस्फोट डॉ. मिरगे यांनी केलाय. आरोपी पोलीस अधिकारी राजेश जाधव यांच्यावर अकोला पोलिसांनी त्वरित केलेल्या कारवाईचा डॉ. मिरगे यांनी कौतुक केलंय. (Crime News)

Akola Crime News : राज्य सरकारच्या नवीन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी,

दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी या प्रकरणावर भाष्य केला आहे. अकोल्यातील महिला कायद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववर कठोर कारवाई करण्याची मागणी अमोल मिटकriआमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधीउमेश यांनी केली आहे. जाधवला राज्य सरकारच्या नवीन कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री संवेदनशील असून ते निश्चितच या प्रकरणात आरोपीला योग्य शिक्षा मिळण्यासाठी पुढाकार घेतला जाणार, असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केलाय.

Akola Crime : राजेश जाधव हा मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार

अशातचसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांचं निलंबन करण्यात आलय. तसेच त्याच्यावर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एएसआय राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अकोल्यातील सिविल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत होती. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी तात्काळ त्याचे निलंबन देखील केलाय. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झाला, सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Akola Crime News : नेमका प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार80 लाखाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेली महिलेला सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एसआय राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीच वय काय? 10 हजार रुपये देतोय रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले. संबंधित महिलेच म्हणणं ऐकून घेतलं, आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील वरिष्ठानी केलाय.

मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर चौकशीची सुरु झालीय. थोड्या वेळातच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यातचं महिला असुरक्षित असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महिला सुरक्षेतेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोये.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.