पुण्यातील

पुणे: पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या (Pune Crime News) प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच पोलिसांना ड्रग्ज व्यवहाराचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणात तब्बल ७६ जणांची नावे पुढे आली असून आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती समोर आली आहे.(Pune Crime News)

ड्रग्ज व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती

याप्रकरणी मिळालेल्या अधिक महितीनुसार, शहरातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा (Pune Crime News) गुन्हा दाखल झाला होता. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती होती. तपासादरम्यान पोलिसांना मुख्य आरोपी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड याच्याबाबत धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा (Pune Crime News) रचत त्याला कोंढवे धावडे परिसरातून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेला राठ्या राठोड हा ड्रग्ज व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्याच्या झडतीत पोलिसांना मेफेड्रोन (MD) मिळाले. उत्तमनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

१७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा

अपहरणाच्या प्रकरणातील आरोपी ड्रग्स पेडलर निघाला. ड्रग्स विक्री प्रकरणी तब्बल ३०० पेक्षा अधिक व्यवहार आणि ९ लाखांची कमाई त्याने केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील ७६ जणांना ड्रग्स विकलं, हे सर्व जणं आता पोलिसांच्या रडारवरती आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना यातील मुख्य आरोपी सुनील गोपाळ राठोड याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान, राठोड हा ड्रग्ज व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मेफेड्रोन मिळाले.(Pune Crime News)

आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राठोडच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना मोठा धक्काच बसला. राठोडने मागील चार महिन्यांत त्याच्या खात्यातून सुमारे ३०० पेक्षा अधिक जवळपास ९ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले. त्याने आजपर्यंत अनेक तरुणांना ड्रग्ज विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या इतर तिघांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.