अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात या दोन दिवसांपासून फरार आहेत
अशोक खरात पत्नी: शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. शिर्डीतील (Shirdi) जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) फरार झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून पोलीस (Police) यंत्रणांना तिचा शोध लागलेला नाही. कल्पना खरातचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
Ashok Kharat Case: नेमके प्रकरण काय?
शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून जमीन बळकावल्याचा आरोप खरात कुटुंबावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Ashok Kharat Wife: SIT आणि पोलिसांची दोन पथके रवाना
कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे. तिला अटक करण्यासाठी SIT (विशेष तपास पथक) आणि शिर्डी पोलिसांची दोन स्वतंत्र पथके नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी SIT चे पथक तिच्या घरी गेले होते, मात्र ती तिथे सापडली नाही. अखेर पोलिसांनी माहिती काढण्यासाठी तिच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Ashok Kharat Wife: तपासावर प्रश्नचिन्ह, पोलिसांची नजर नव्हती का?
खरात कुटुंबाचा आर्थिक व्यवहारात मोठा सहभाग असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत जेव्हा SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू होती, तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांवर पाळत का ठेवली गेली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील आरोप अशोक खरात आधीच अटक असून त्याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. तर अरविंद बावके आणि किरण सोनावणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांकडून इतर आरोपींचाही शोध सुरु आहे.
Ashok Kharat Case: कोट्यवधींची मालमत्ता रडारवर
भोंदू अशोक खरातची शिर्डीत कोट्यवधींची मालमत्ता असून या सर्व आर्थिक व्यवहारांची SIT कडून कसून चौकशी केली जात आहे. कल्पना खरात हिच्या अटकेनंतर या व्यवहारांमधील अनेक मोठी गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र, ती अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने शिर्डीत खळबळ माजली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.