कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस, तिच्या भावाची चौकशी करताच धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) फरार असल्याने आता एसआयटीकडून खरात नातलगांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरात अद्याप मिळून न आल्याने कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
कल्पना खरातने शिर्डीत एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केली आहे. यासंदर्भात कल्पना आणि अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. यावेळी कल्पनाचे दोन भावांची देखील चौकशी एसआयटीने केल्याची माहिती समोर आली आहे. जमीन खरेदीच्या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना आणि कल्पनाचे भाऊ यांचा देखील आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासा दरम्यान उघडकीस आलं आहे. यामुळे आता खरात प्रकरणांमध्ये अशोक खरातचे संबंधित यांची चौकशी सुरू असताना खरातच्या नातलगांची देखील चौकशी एसआयटीकडून केली जात आहे. अशोक खरात पती-पत्नी चौकशी दरम्यान नातलग देखील आता एसआयटीच्या फेरीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
एसआयटीच्या हाती अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे- (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे आणि अशोक खरातचे काळे कारणामे हे दररोज एसआयटी तपासात समोर येत आहे. एसआयटीच्या हाती अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे लागले असून या प्रकरणात अशोक खरातकडून कोणतीही चौकशी दरम्यान सहकार्याची भावना नसते. यामुळे एसआयटीकडून आता अशोक खरात याच्या नातलगांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलील कोठडी- (Ashok Kharat Police Custody)
शोक खरात प्रकरणात काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलील कोठडी सुनावली. या सुनावणीसाठी अशोक खरात याला व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले. अशोक खरातच्या सुरक्षेच्या कारणामुळे एसआयटीकडून अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज केला होता. एसआयटीचा हा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. आज अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची एसआयटीला परवानगी दिली. यावेळी कोर्टरुममध्ये 4 स्क्रीन लावण्यात आल्या. बीइन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातप्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.