अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये 12 लाखांच्या खंडणीचा नवा प्रकार; चार जणांना सिनेस्टाईल

नाशिक: शहरात एकीकडे अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, दुसरीकडे खंडणीखोरांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यावसायिकाच्या टॅबमधील खासगी व्हिडीओ व्हायरल (Nashik Crime News) करण्याची धमकी देऊन १२ लाखांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांना सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक ज्येष्ठ व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिसमधील टॅब चोरीला गेला होता. या टॅबमध्ये त्यांच्या एका मैत्रिणीसोबतचे काही खासगी व्हिडीओ होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयितांनी संबंधित व्यावसायिकाकडे १२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.(Nashik Crime News)

पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग

खंडणीखोरांनी या व्यावसायिकाला पैसे देण्यासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट २ च्या पथकाने सापळा रचला. संशयित आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि चित्रपटाला शोभावा अशा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. १० हजार रुपयांची पहिली हप्ता स्वीकारताना या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.(Nashik Crime News)

फिर्यादी व्यावसायिकही संशयाच्या भोवऱ्यात?

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे तपास सुरू असतानाच, पोलिसांना तक्रारदार व्यावसायिकाबाबतही काही संशय आहे. त्या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये नेमके किती आणि कोणत्या प्रकारचे व्हिडीओ होते? तसेच यामागे काही वेगळे रॅकेट आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाची तक्रार असली तरी, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू आहे.(Nashik Crime News)

अशोक खरात प्रकरणामुळे नाशिक आधीच चर्चेत असताना, आता खंडणी आणि अश्लील व्हिडीओच्या या नवीन प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 10 हजार स्वीकारताना 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.