मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान पडताळणीचं काम जोमाने सुरू आहे. त्यासाठी, प्रशासनातील कर्मचारी कामाला लागले असून बीएलओद्वारे ही प्रक्रिया पुढे जात आहे. मात्र, मतदारांची प्रत्यक्ष पुनर्पडताळणी करणाऱ्या बीएलओवर रिसोड शहरात काही जणांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम (Washim) जिल्ह्याच्या रिसोड शहरात मतदार प्रत्यक्ष पुर्नपडताळणी मॅपिंगच्या कामासाठी गेलेल्या बीएलओवर हल्ल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे निवडणूक कामकाजाच्या पडताळणीबाबत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रिसोड शहरात 2002 आणि 2024 च्या पुनर्मतदानाची प्रत्यक्ष पडताळणी मॅपिंगसाठी गेलेल्या बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ला करतांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून जखमी मुंढेना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर अवस्थेत  तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या ते उपचार घेत आहेत. या घटनेनंतर मतदार पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला, मात्र अद्याप आरोपींचा शोध घेतला जात आहे, कुणालाही अटक करण्यात आली नाही.

वाशिम जिल्ह्यात सलग दिसऱ्या दिवशी अवकाळी

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकटासह, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आज गारपिटही झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. वाशिम शहरात जवळपास 45 मिनिटं पावसाच्या सरी बरसल्या, पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहावयास मिळालं. तर, कारंजा तालुक्यातील जाम्ब गाव परिसरात गारांचा पाऊस पडला. यासह जिल्ह्यात अनेक भागात गारपीट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे बीजवाई कांदा उत्पादक,आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा

संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या

आणखी वाचा

Comments are closed.