बेपत्ता व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह झुडपात आढळला; डोक्यावर वार करून संपवल्याचा संशय, नागपूर

नागपूर क्राईम न्यूज: नागपूरच्या वाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून बेपत्ता असलेल्या एका नामांकित मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यावसायिकाचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह लावा परिसरातील खडगाव मार्गावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुचित भोजापुरे (44) असे मृतकाचे नाव असून, त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Nagpur Crime News: नेमकी घटना काय?

सुचित भोजापुरे हे शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने वाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची तक्रार (Missing Complaint) नोंदवण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी खडगाव मार्गावरील निर्जन स्थळी असलेल्या झुडपांत एका व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसला. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nagpur Crime News: ओळख पटवण्यात पोलिसांपुढे आव्हान

मृतदेह पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत होता, तसेच घटनास्थळी त्यांचे वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू मिळून आली नाही. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात प्रचंड अडचणी आल्या. अखेर, बेपत्ता तक्रारींच्या आधारे पोलिसांनी भोजापुरे यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाचे छायाचित्र दाखवले असता, तो मृतदेह सुचित यांचाच असल्याची खात्री झाली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता.

Nagpur Crime News: खुनाचा संशय आणि वडिलांचा आरोप

सुचित यांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला आहे. सुचित यांच्या वडिलांनी हा थेट खुनाचा प्रकार असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Nagpur Crime News: परिसरात भीतीचे वातावरण

वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी श्वानपथकाची पाचारण करण्यात आले होते. व्यावसायिक सुचित भोजापुरे यांच्या हत्येमुळे नागपुरातील व्यापारी वर्गात आणि वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Nashik Crime News: पैशांसाठी अन् जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर…; अशोक खरातने कांदा व्यापाऱ्याला 85 लाखांना गंडवलं, नाशिकमध्ये 12 वा गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.