राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू, टॉप-5 मधून मुंबई OUT; ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत

आयपीएल 2026 पॉइंट्स टेबल अपडेट मराठी : आयपीएल 2026 मध्ये 4 एप्रिल शनिवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत महत्त्वाचे दोन गुण मिळवले. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळाले.

राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू (IPL 2026 Points Table Update)

राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली असून दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग दोन विजयांसह पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानावर आहे, तर एक सामना जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादने एक विजय आणि एक पराभवासह पाचवे स्थान मिळवले आहे.

टॉप-5 मधुन मुंबई आऊट

दुसरीकडे, या पराभवानंतर मुंबई इंडियन्स टॉप 5 मधून बाहेर पडत सहाव्या स्थानावर घसरली आहे. गुजरात टायटन्सलाही सलग दुसऱ्या पराभवाचा फटका बसला असून ते सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे उलटफेर (IPL 2026 Orange Cap and Purple Cap)

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप शर्यतीबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या समीर रिझवीने दिवसाअखेर अव्वल फलंदाज म्हणून स्थान पटकावले असून सध्या ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. तर गुजरातविरुद्ध चार विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या रवि बिश्नोईने पर्पल कॅपवर घेतली. विजयकुमार वैशाखच्याही नावावर 5 विकेट्स असल्या, तरी सरासरीच्या आधारावर बिश्नोई सध्या अव्वल स्थानी आहे.

आयपीएल 2026 पॉइंट टेबल अपडेट

संघ (संघ) समोर विजय पराभव मालमत्ता निव्वळ रन रेट
राजस्थान रॉयल्स 2 2 0 4 +२.२३३
दिल्ली कॅपिटल्स 2 2 0 4 +१.१७०
पंजाबचे राजे 2 2 0 4 +0.637
आरसीबी 0 2 +२.९०७
सनरायझर्स हैदराबाद 2 2 +०.४६९
मुंबई इंडियन्स 2 2 -0.206
गुजरात टायटन्स 2 0 2 0 -0.424
लखनौ सुपर जायंट्स 0 0 -1.397
केकेआर 2 0 2 0 -1.964
चेन्नई सुपर किंग्ज 2 0 2 0 -2.562

आयपीएल 2026 ऑरेंज कॅप

खेळाडू समोर डाव धावा
समीर रिझवी 2 2 160
रोहित शर्मा 2 2 113
कूपर कॉनोली 2 2 108
अंगकृष रघुवंशी 2 2 103
इशान किशन 2 2 ९४

आयपीएल 2026 पर्पल कॅप

खेळाडू समोर विकेट्स सरासरी धावा
रवी बिश्नोई 2 ११.४ ५७
विजय कुमार वैशाख 2 १४.४ ७२
टी नटराजन 2 4 १३.२५ ५३
लुंगी ngidi 2 4 १५.२५ ६१
जयदेव उनाडकट 2 4 १२.५ 50

हे ही वाचा –

GT vs RR IPL 2026 : राजस्थानचा ‘रॉयल’ विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो

आणखी वाचा

Comments are closed.