सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी गेम फिरवला, लक्ष्मण हाकेंची माघार, दत्तात
Baramati By Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Baramati By Election 2026) रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. यामुळे बारामतीमधील लढत आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी होणार आहे.
Baramati By Election 2026: दत्तात्रय भरणे यांची यशस्वी ‘फिल्डिंग’
लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. मात्र, त्याच वेळी महायुतीचे नेते कामाला लागले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती आणि बारामतीच्या विकासाची निरंतरता लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीला पाठिंबा मिळावा, यासाठी भरणे यांनी हाके यांची मनधरणी केली.
Baramati By Election 2026: सुनेत्रा पवारांच्या एका फोनने बदलले समीकरण
स्वतः सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मण हाके यांना फोन करून चर्चेचे आवाहन केले होते. याबद्दल बोलताना हाके म्हणाले की, सुनेत्रा ताई पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेउदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्ता भरणे या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी विचार केला. सुनेत्रा पवार यांचा ज्यावेळेस मला फोन आला, त्यावेळेस मी ठरवले की नाही. इतके सगळे लोक आपल्याला फोन करत असतील तर आपण विचार करायला हवा,
असे म्हणत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.
Baramati By Election 2026: मी माझ्या प्रश्नावर ठाम राहणार
लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हणाले की, माझा आता देखील फॉर्म तयार आहे. पण, विद्रोहाची भूमिका घेत असताना अशा गोष्टींना सामोरे जावेच लागते. मी माझ्या प्रश्नावर ठाम राहणार आहे. मी माझे प्रश्न आक्रमकपाने मांडतच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Baramati By Election 2026: काँग्रेसकडून आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवून आव्हान कायम ठेवले आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही ही निवडणूक ‘अजितदादाच लढवत आहेत’ असे मानून सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. आज आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.