अशोक खरात, पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी पुन्हा समोरासमोर बसवलं; नेमकं काय काय समोर आलं
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून खरातच्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि एक कर्मचारी याची पुन्हा चौकशी केली. अशोक खरातच्या काळे कारणामेसह आर्थिक व्यवहारांची देखील विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.
मंदिरात होणाऱ्या पूजा, पूजेसाठी घेतलेल्या देणग्या तसेच इतर दान स्वरूपात येणारा पैसा कोणत्या खात्यात जात होता. कॅश स्वरूपात किती पैसे दान येते तर, आर्थिक व्यवहार कोणाच्या नावावर होत होते अशी सर्व माहिती पुजारी कडून घेऊन इतर मंदिरात विशेष महापूजा सुरु होत्या. त्यासाठी कोण पूजाविधी करत, कोणत्या पूजा केल्या जात होत्या. त्यासाठी काही आर्थिक व्यवहार होत होते का? अशी सर्व माहिती पुजारी, कर्मचारी यांच्याकडून तपास पथकाने घेतली. तसेच काही पुरावे आणि साक्षीदार तयार करत जबाब नोंदवण्यात आले असून अशोक खरात आणि पुजारी तसेच एक कर्मचारी यांची पुन्हा एसआयटीकडून समक्ष चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case)
युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार- (Ashok Kharat ED Inquiry)
अशोक खरात यांच्या बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. तपासात 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात ‘समता नागरी पतसंस्था’सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून असून, ती खाती त्यांच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 100 कोटींच्या मालमत्तांवरही ED चे लक्ष आहे. या मालमत्ता त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो-हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत 19.56 कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काळा पैसा, कर चुकवेगिरी आणि बेनामी गुंतवणुकीचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिक, सिन्नर आणि शिर्डी येथे 52 हून अधिक जमिनींची चौकशी ईडी करणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
तेजस्वी सातपुते टुडे पत्रकार परिषद घेणार- (अशोक खरात प्रकरण)
अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.