सापाची कात, कवडी, पक्ष्यांचे अवयव…; एरंडेच्या ऑफिसमध्ये काय-काय सापडलं? चौकशी संपताच एरंडेच्य
नाशिक क्राईम न्यूज : प्रतिष्ठेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या तथाकथित पत्रकार आणि कन्सल्टंट रवींद्र नारायण एरंडे (वय 63) याच्या पाशात अडकलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या एरंडेच्या पोलीस कोठडीत नाशिक सत्र न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त करण्यात आल्याने, या प्रकरणात आता ‘भोंदूगिरी’चा अँगलही स्पष्ट झाला आहे.
Nashik Crime News: भोंदूगिरीवर शिक्कामोर्तब, कार्यालयात काय आढळले?
अशोक खरातप्रमाणेच एरंडेने देखील महिलांना विविध आमिषे दाखवून भोंदूगिरी केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्या सातपूर येथील कार्यालयाची झाडाझडती घेतली असता, तिथे सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्या. या वस्तूंचा वापर तो महिलांना घाबरवण्यासाठी किंवा वश करण्यासाठी करत होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याशिवाय त्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
Nashik Crime News: ‘ऑफिस बॉय’मुळे फुटले अत्याचाराचे बिंग
स्वतःचे पाप लपवण्यासाठी एरंडेने सुरुवातीला काही जणांनी 12 लाखांची खंडणी मागितल्याचा बनाव रचला होता. मात्र, त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडी आणि पेनड्राइव्हमध्ये 100 हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या धक्कादायक पुराव्यांनंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
Nashik Crime News: 8 पीडितांची ओळख पटली
तपासादरम्यान एरंडेच्या जाळ्यात अडकलेल्या 8 महिलांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर अनेक पीडितांनी पुढे येऊन माहिती दिली आहे. नोकरीचे आमिष दाखवून किंवा इतर फसवणुकीद्वारे त्याने या महिलांची पिळवणूक केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलीस सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या महिलांचे प्रबोधन करत असून त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Nashik Crime News: सन्माननीय प्रतिमेचे ‘काळेकुट्ट’ वास्तव
रवींद्र एरंडे हा सातपूर भागात स्वतःला मोठा पत्रकार आणि समाजसेवक म्हणवून घेत असे. राजकीय मंडळींसोबतचा वावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मिळालेले सन्मान यामुळे त्याची समाजात एक ‘प्रतिष्ठित’ प्रतिमा होती. सावरकरनगर येथील महापालिकेच्या अभ्यासिकेवर कब्जा मिळवणे असो किंवा ग्रीन जिमचा ताबा, एरंडेचा परिसरात मोठा दरारा होता. मात्र, आता त्याच्या या सन्माननीय प्रतिमेमागचे काळे वास्तव समोर आल्याने सातपूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Nashik Crime News: न्यायालयात चेहरा लपवत घोषणाबाजी
सोमवारी (दि. 6) पोलीस कोठडी संपल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयात तपासाबाबत सविस्तर माहिती दिली. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयातून बाहेर पडताना स्वतःचा चेहरा लपवत एरंडेने “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” अशी घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.