निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ल
बीड क्राईम न्यूज : बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर (Beed Municipal Council Election) शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण झाल्याने, शिवसेनेचे (Shiv Sena) पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव (Balasaheb Jadhav) यांनी आपल्या समर्थकांसह भाजप (BJP) नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा सर्व प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Beed Crime News: नेमकी घटना काय?
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या भाग्यश्री देशपांडे यांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव हे संतप्त होते. निकाल लागल्यापासूनच जाधव हे भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांना सतत टार्गेट करत होते.
कधी रस्त्याने जाताना शिवीगाळ करणे, तर कधी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणे, अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात होत्या. शुक्रवारी रात्री सागर देशपांडे हे आपल्या घराच्या दारात फोनवर बोलत उभे होते. याच संधीचा फायदा घेत बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर 5 ते 7 जणांनी अचानक देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला.
Beed Crime News: CCTV मध्ये कैद झाला भ्याड हल्ला
हल्लेखोरांनी सागर देशपांडे यांना घेरून त्यांना काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याला, पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून, त्यात हल्लेखोर मारहाण करताना दिसत आहेत.
बीड क्राईम न्यूज : पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी सागर देशपांडे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.