मी तुमच्यासारखा पाच पक्ष बदलत नाही, आमदार महेश शिंदेंच्या ऑफरला शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर

महेश शिंदे यांच्यावर शशिकांत शिंदे: आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत करेन असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलं होतं. त्यांनी केलेल्या या टीकेला शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझा पिंड लढण्याचा आहे. मी जिथे असतो तिथं प्रामाणिक असतो, यांच्यासारखा पाच पक्ष बदलत नाही अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली. ते माझे शिवसेनेत स्वागत करत आहेत, पण यापुढे ते शिवसेनेत आहेत का? याचा त्यांनी शोध घ्यावा. कारण शिवसेनेत त्यांची विश्वासाहर्ता राहिलेली नाही असा टोलाही लगावला.

महेश शिंदे यांनी मला ऑफर देण्यापेक्षा त्यांचं अस्तित्व धोक्यात

महेश शिंदे यांनी मला ऑफर देण्यापेक्षा त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळं त्यांनीच पर्याय शोधावा. जर नाही मिळाला तर मला सांगा मी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना पद मिळवून देण्यासाठी माझं वजन वापरेन असा टोला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना लगावला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत अनेक त्रुटी आहेत. त्यांना जो कुणबी दाखला मिळालेला आहे. चिंचणेर वंदन गावामध्ये कोणीही बर्गे कुणबी नाहीत. जो त्यांनी दाखला घेतला आहे त्याविषयी प्रांत तहसीलदाराकडे आमदार महेश शिंदे मुक्काम ठोकून असतात असं समजत असल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले. जी वंशावळ दाखवली आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. मी यावर आज बोलणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी आवारातील सीसीटीव्ही बंद ठेवणे हा 100 टक्के प्री प्लान आहे. हे जाणीवपूर्वक केलेले आहे असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शरद पवार यांनी मांडलेला मुद्दा हा सत्य

न्यायालयात सीसीटीव्ही का बंद होते हे सर्व स्पष्ट कराव लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील लोकांनी पाहिलेलं आहे. हा लोकशाहीचा झालेला खून आहे असे मत शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राज्यावरुन व्यक्त केले. जातीच्या दाखल्याबाबत सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हा पुरावा प्रशासनाला सादर करावा लागतो. त्यांची वंशावळ शोधण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी मांडलेला मुद्दा हा सत्य आहे. वारकरी संप्रदाय हा पांडुरंग तुकोबा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्रामध्ये सांप्रदाय वाढवण्याचे काम केलं आहे.

सत्तेमधला पक्ष भाजप हा वारकरी संप्रदाय आपल्याकडे कसा येईल यासाठी प्रलोभने दिली जात आहेत.  फूट पाडण्यासाठी देखील प्रयत्न केला जातो. सांप्रदायाची महाराष्ट्रात मोठी लोकप्रियता आहे. अशामध्ये काही लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या भोसलेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.तो भोसले आहे का कोण आहे हे शोधावे लागेल असे घुसखोर आल्यामुळं खऱ्या वारकऱ्यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे असे शशिकांत शिंदे म्हणाले.

अजित दादांच्या अपघाताबाबत अजून देखील शंका

अजित दादांच्या अपघाताबाबत अजून देखील शंका आहे. सीआयडी कडून तपासाबाबतची माहिती दिली जात नाही. सीबीआई ने सुद्धा चौकशी स्वीकारली नाही. याचा खुलासा झाला नाही. विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करा असे जय पवार देखील म्हणाले होते. त्या मालकावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये. यामुळे या शंका कायम उपस्थित केल्या जातील.

महाविकास आघाडीमधील पक्ष सविस्तरपणे चर्चा करुन एकत्र पॉलिसी करण्याबाबत चर्चा करणार

महाविकास आघाडीची घडी विस्कटली आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. यावर शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी एकत्र बसून आम्ही धोरण ठरवणार आहोत, फक्त निवडणुका आल्या की आम्ही एकत्र येत असतो. पॉलिसी डिसिजन साठी आम्ही एकत्र येणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीमधील पक्ष सविस्तरपणे चर्चा करुन एकत्र पॉलिसी करण्याबाबत चर्चा करु आमच्यात कोणताही वाद नाही असे शशिकांत शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या स्वर सम्राज्ञींना आम्ही मुकलोय

महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं उत्तम गायिका म्हणून आशा भोसले यांनी नाव कमावलं..आज त्यांचे दुःखद निधन झाले. महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या चांगल्या स्वर सम्राज्ञींना आम्ही मुकलोय. अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आणखी वाचा

Comments are closed.