अशोक खरातने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही, हिरव्या रंगाच्या द्रव्याने गूढ वाढवलं, आ
अशोक खरात: दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. एसआयटीने (SIT) खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य सापडले आहे. हेच ते गुंगीकारक औषध आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे? याचे उत्तर आता फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे.
Ashok Kharat: काय आहे त्या ‘हिरव्या द्रव्या’चे रहस्य?
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले हे द्रव्य अत्यंत संशयास्पद आहे. महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी खरात या द्रव्याचा वापर करत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. एसआयटीने हे नमुने तातडीने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खरातचा ‘पेनड्राइव्ह’ आणि हे ‘हिरवे द्रव्य’ हे दोन पुरावे त्याला जन्मठेपेपर्यंत खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Ashok Kharat: आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज, सोमवार (दि. 13 एप्रिल) रोजी संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, एसआयटी आता अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे तब्बल 14 गुन्हे दाखल झाले आहेत.
Ashok Kharat: खरातने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही
या प्रकरणात चिंचोंक्याचे खडे बनवून देणारा व्यावसायिक महेश कलंत्री याच्यापासून ते खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीतून खरातच्या गुन्हेगारी कार्यपद्धतीचे अनेक धक्कादायक तपशील समोर आले असून, तपासाचा हा अहवाल आज न्यायालयात सादर केला जाईल. भोंदू अशोक खरात याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सात महिन्यांच्या गरोदर महिलेवरील अत्याचार प्रकरणात सध्या एसआयटीकडून त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. आजच्या सुनावणीत सरकार पक्ष काय भूमिका मांडतो आणि न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, तिसऱ्या गुन्ह्यातील आरोपीला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी एसआयटीकडून अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, ‘देवाला माहिती…’
आणखी वाचा
Comments are closed.