अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला…
अशोक खरात क्राईम न्यूज: स्वतःला ‘दैवी अवतार’ भासवून शेकडो भाविकांना गंडा घालणारा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) आता पूर्णपणे जमिनीवर आला आहे. पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत आहे, तसतशी खरातच्या पायाखालची जमीन सरकली असून, कधीकाळी पोलिसांनाच (Police) धमकावणारा हा भोंदू आता कोठडीत पुरता हबकला असल्याची माहिती समोर येत आहे.
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा काही वेगळाच होता. ” तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल,” असे म्हणत तो चक्क तपास करणाऱ्या पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, एसआयटी (SIT) आणि ईडीच्या (ED) वाढत्या चौकशीमुळे आता त्याची बोलती बंद झाली आहे. आपण आता सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला पटली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जीवन कामी झालं
कोठडीत खरात आता जास्त कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांनाही तो त्रोटक उत्तरे देत आहे. चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास शांत बसून असतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारेच व्हावी, अशी विनंती तो अधिकाऱ्यांकडे वारंवार करत आहे.
Ashok Kharat Crime news: बायकोचा पत्ता विचारताच अशोक खरात म्हणाला…
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे? असा प्रश्न जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी विचारला, तेव्हा खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, दुसरीकडे आपला लाडका मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी तो व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे करत आहे.
Ashok Kharat Crime news: अशोक खरातला आजचा न्याय हजार कर्नार
दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज (दि. 13) पुन्हा नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा आज अशोक खरातला पोलीस कोठडीत मिळण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसापासून एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत काय तपास झाला? याचा तपशील तपास यंत्रणा कोर्टात सादर करणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.