पांड्या बंधूंमध्ये बिनसलं, हार्दिक बाद होताच कृणालच्या कृतीने लक्ष वेधलं, महिकाचा डेंजर लूक, VI
हार्दिक पांड्या आणि कुणाल पंड्या एमआय वि आरसीबी आयपीएल 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दरम्यान, मुंबई आणि बंगळुरुच्या या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात काहीतरी बिनसल्याचं बोललं जात आहे.
मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यात कोणताही दृश्य संवाद किंवा नेहमीचा जिव्हाळा दिसून आला नाही. अगदी फलंदाजी करत असतानाही, हार्दिक मैदानावर कृणालच्या दिशेने थोडा आक्रमक पवित्रा घेताना दिसला. हार्दिकला बाद केल्यानंतर कृणालने केलेला जल्लोषही काहीतरी वेगळेच संकेत देत होता. तसेच कृणाल पांड्याचं हे सेलिब्रेशन पाहून हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड महिका शर्माने दिलेल्या लूकची चर्चाही सुरु आहे. (Hardik Pandya And Kunal Pandya)
भैरवी शिगेला पोहोचली होती, भावना उफाळून येत होत्या#MIvRCB | [Mumbai Indians, Rohit, Kohli, Tilak, Rajat Patidar] pic.twitter.com/CTEtAgcNiB
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 12 एप्रिल 2026
हार्दिक आणि कृणाला एकमेकांच्या पोस्टही लाईक करत नाही- (Hardik Pandya And Kunal Pandya)
एकेकाळी सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हे दोन भाऊ हार्दिक आणि कृणाल यांच्यात सध्या काहीतरी बिनसले असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. एका सोशल मीडिया युजर्सने लिहिले, महिका शर्मा हार्दिक पांड्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी, तो सर्व सण-उत्सव आपला भाऊ कृणालसोबतच साजरे करायचा. मात्र आता हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्ट लाईकसुद्धा करत नाही. महिका शर्माने हार्दिकला पूर्णपणे बदलून टाकले आहे, असंही एका युजर्सने लिहिले आहे.
आयसीसी टॉफी जिंकल्यानंतरही कृणालकडून पोस्ट नाही- (हार्दिक पांड्या आणि कुणाल पंड्या)
दुसऱ्या एका युजर्सने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे म्हणाला की, हार्दिक-कृणाल यांच्यात काहीतरी बिनसले आहे का? हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे नेहमीच एकमेकांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. मात्र, हार्दिकचा नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर, परिस्थिती थोडी वेगळीच भासू लागली आहे. (घटस्फोटानंतर) कृणाल आणि त्याची पत्नी नताशासोबत दिसून आले होते, तर हार्दिक विविध कार्यक्रमांमध्ये महिकासोबत अधिक वेळ घालवताना दिसला आहे. हार्दिकने नुकतीच एक ‘आयसीसी’ (ICC) ट्रॉफी जिंकली असूनही, कृणाल किंवा त्याच्या पत्नीकडून सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट किंवा जाहीर कौतुक करण्यात आले नाही.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.