नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळब

नाशिक म्हाडा घोटाळा : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये गृहनिर्माण क्षेत्रात एक मोठी खळबळजनक घटना समोर आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव असलेली 20 टक्के घरे व जमिनी म्हाडाकडे वर्ग न करता, सरकारची फसवणूक केल्याचा आरोप शहरातील 49 नामांकित बिल्डरांवर करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

Nashik Mhada Scam: काय आहे नेमकं प्रकरण?

नियमानुसार, 4 हजार चौरस मीटर (सुमारे 1 एकर) पेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 20 टक्के जागा किंवा घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक असते. ही जागा म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, नाशिकमधील अनेक विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा इतर पळवाटा शोधून ही घरे सरकारला दिलीच नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Nashik Mhada Scam: SIT मध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश

या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती (SIT) स्थापन केली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक (मुद्रांक शुल्क), नाशिक पोलीस आयुक्त, नगररचना संचालक, भूमी अभिलेख उपसंचालक यांचा समावेश आहे.

Nashik Mhada Scam: दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या जमिनीचे मालक किंवा विकासक या घोटाळ्यात दोषी आढळतील, त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच, ज्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहाराकडे डोळेझाक केली किंवा विकासकांना मदत केली, त्यांच्यावरही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

Nashik Mhada Scam: एका महिन्यात अहवाल सादर होणार

या उच्चस्तरीय समितीला संपूर्ण चौकशी करून एका महिन्याच्या आत आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक नामांकित आणि ‘बड्या’ बिल्डरांची नावे या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Court Hearing: पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? न्यायाधीशांचा अशोक खरातला सवाल, भोंदूबाबाने एकाच शब्दात दिलं उत्तर; म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.