IPL 2026 – हार्दिक पंड्या आणि टिम डेव्हिडवर कारवाई, दोघांनाही ठोठावला दंड; कारण काय?
IPL 2026 मध्ये रविवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर टिम डेव्हिड आणि हार्दिक पांड्या यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. आरसीबीचा फलंदाज टिम डेव्हिडने अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याबद्दल आणि वारंवार सांगूनही चेंडू अंपायरकडे न दिल्याबद्दल त्याच्यावर मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. डेव्हिडने आचारसंहितेच्या कलम 2.4 चे उल्लंघन केल्याची कबुली दिली आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील मुंबईचा हा पहिलाच असा गुन्हा असल्याने ही कारवाई करण्यात आली. या सामन्यात आरसीबीने मुंबईवर विजय मिळवला असून मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. याच सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दुखापतींमुळे चाहते देखील चिंतेत आहेत.
IPL 2026 – RCB च्या हुकूमी एक्क्याला दुखापत; चाहत्यांची धाकधूक वाढली, कर्णधार काय म्हणाला?
Comments are closed.