Ratnagiri News – साडवलीच्या वरद नलावडेचे एमपीएससी परीक्षेत यश; सहाय्यक कर अधिकारी पदी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील ग्रामीण भागातील तरुण वरद बळवंत नलावडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. वरदने या परीक्षेत राज्यात ३४ वा क्रमांक पटकावला असून, त्याची सहाय्यक कर अधिकारी (Assistant Tax Officer) पदी निवड झाली आहे. वरद हा साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक बळवंत नलावडे यांचा मुलगा असून, त्याने आपल्या जिद्द आणि खडतर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

वरदच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, साडवली परिसरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्याच्या या यशाची दखल घेत माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद सदस्या नेहा माने आणि युवासेना राज्य सचिव प्रदुम्न माने यांनी वरदचा विशेष सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या मातृभूमीच्या आणि शाळेच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या वरदवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.