IPL 2026 नंतर भारतीय टी-20 संघात होऊ शकतात मोठे बदल; गौतम गंभीर 'या' तरुण खेळाडूला देणार संधी?

आयपीएलनंतर (IPL 2026) भारतीय संघ आता पुढील आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आणि 2028 च्या ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार आहे. त्यामुळे संघात काही मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता टी-20 संघात जास्तीत जास्त तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलामीवीर अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) जागी तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) संधी दिली जाऊ शकते. तसेच तिलक वर्माचा सध्याचा खराब फॉर्म टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला पुन्हा संघात स्थान मिळू शकते.

सर्वात मोठा बदल म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) विश्रांती देऊन किंवा बाहेर बसवून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा एकदा टी-20 संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, गंभीर आणि टीम मॅनेजमेंट आता भविष्यातील मोठ्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

Comments are closed.