Mumbai News – भांडुपजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आयशर ट्रकची कामगारांना धडक; एक जागीच ठार, 2 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भांडुप पंपिंग स्टेशनजवळ भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंदन कुमार मदन प्रसाद असे मयत कामगाराचे तर जोजो थॉमस आणि मुकेश कुमार सिंग अशी जखमींची नावे आहेत.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, चंदन कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास होता. 14 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो भांडुप पंपिंग स्टेशनजवळ नाईट ड्युटीवर गेला होता. बुधवारी पहाटे 4.15 च्या सुमारास आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत कामाच्या ठिकाणी बसले असताना भरधाव आयशरने बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केला आणि तिघांना धडक दिली.

या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसादला मुलुंड पश्चिम येथील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. मोहम्मद ताजीर जान मोहम्मद असे आरोपी चालकाचे नाव आहे. पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.

Comments are closed.