IPL 2026 – गोलंदाजांचा कहर, कोहलीचा करिष्मा; लखनऊवर 5 गडी राखून दणदणीत विजय अन् बंगळुरूची टॉपवर एन्ट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी करत लखनऊ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून मोठा विजय मिळवला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB ने 29 चेंडू राखून लक्ष्य गाठत पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊला RCB च्या भेदक गोलंदाजांनी केवळ 146 धावांवर रोखले. जोश हेजलवूडने सुरुवातीला कडक मारा करत निकोलस पूरनचा महत्त्वाचा बळी घेतला, तर रसिख सलाम दार (4/24) आणि भुवनेश्वर कुमार (3/27) यांनी अचूक टप्प्यावर मारा करत लखनऊची फलंदाजी विस्कळीत केली.

लखनऊकडून मिचेल मार्श (40) आणि आयुष बडोनी (38) यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या षटकांत विकेट्स कोसळल्याने मोठा स्कोअर उभारता आला नाही. प्रत्युत्तरात RCB कडून विराट कोहलीने 49 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. त्यानंतर रजत पाटीदारने 27 धावांची उपयुक्त खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरीस RCB ने 15.1 षटकांत लक्ष्य पार करत एकतर्फी विजय नोंदवला

Comments are closed.