मांसाहारी अस्वल झाले शाकाहारी, काय आहे कारण?





जगभरात वन्यप्राण्यांच्या खाद्यपद्धतीत वेगाने बदल होताना दिसू लागला आहे. यात अस्वलांचे बदललेले खाद्य सध्या चर्चेत आहे. कारण मांसाहारी असलेले अस्वल चक्क झाड पाला आणि फळं खाऊ लागले आहेत. यामुळे शास्त्रज्ञही अवाक झाले असून याचा अर्थ पर्यावरणातील बदल बघून वन्यप्राणी देखील जिवंत राहण्यास जे पर्याय उपलब्ध आहेत ते स्विकारू लागले आहेत.

बदलत्या तापमानाचा वन्यजीवांवर होणारा परिणाम यावर करण्यात आलेल्या संशोधनात अस्वल पूर्णतहा शाकाहारी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिस्थितीला ट्रॉफिक रिवायरिंग असे नाव देण्यात आले आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम निसर्गचक्रावर होत आहे. प्राण्यांच्या खाद्य पद्धतीवरही याचा परिणाम होताना दिसू लागला आहे. यामुळे मांसाहार हे प्रमुख अन्न असलेले वन्यप्राणीही झाड पाला वनस्पती, फळं खाऊन पोट भरू लागले आहे.

त्यातही अस्वल हा प्राणी जिथे वास्तव्यास असतो तिथे उपलब्ध असेल तेच खाण्यास तो प्राधान्य देतो. त्यामुळे बऱ्याचवेळा जांभुळ खातानाही तो दिसतो. तर कधी जांभळाच्या झाडाच्या जवळपास उगवलेल्या वनस्पतीही तो खातो. पण त्याचबरोबर मासे, किडे, छोटे सस्तन प्राणी हे देखील त्याच्या अन्नाचा प्रमुख भाग आहे. पण हवामान बदलामुळे अस्वलासारखे मांसाहारी सस्तन वन्यजीव शाकाहारी होत असल्याचे पहील्यांदाच आढळले आहे.



Comments are closed.