‘त्या’ महिलांवर पोलीस केसेस दाखल करून नावे अन् फोटो जाहीर करा; माजी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

सुबोध सावजी: राज्यातील राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Savji) यांनी अत्याचाराच्या प्रकरणांवरून थेट राज्यपालांना पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी वादग्रस्त मागण्या केल्या आहेत. “स्वतःहून अत्याचार करून घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल कराव्यात आणि त्यांची नावे, फोटो व व्हिडिओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावे,” असे विधान सावजी यांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात अत्याचाराचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले आहे. त्यांच्या मते, एक जबरदस्तीने केलेला अत्याचार आणि दुसरा महिलेने स्वतःहून करवून घेतलेले अत्याचार. जबरदस्तीने झालेल्या अत्याचारातील पीडित महिलांची नावे गुप्त राहिलीच पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या महिला स्वार्थासाठी किंवा पैशांसाठी असे कृत्य करतात, अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. त्यांना समाजासमोर आणणे हे माझे तसेच राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आहे.

Subodh Savji: व्हिडिओ आणि फोटो उघड करण्याची मागणी

सावजी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, भोंदू बाबा, संत, महात्मे किंवा आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला ठिकठिकाणी जाऊन असे कृत्य करतात. सध्याच्या कायद्यानुसार पीडितेचे नाव जाहीर करता येत नाही आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई होते. मात्र, सावजी यांनी ही पद्धत बदलण्याची मागणी केली आहे. “अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला असे वागणार नाहीत आणि स्वार्थासाठी होणारे प्रकार कमी होतील,” असा दावा त्यांनी केला आहे.

Subodh Savji: राज्यपालांना पत्रातून विनंती

राज्यातील जनतेसह आपणास अशी विनंती आहे की, ज्या महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण हे सर्व शासनाने जाहिर करावे. आपण या बाबत शासनास निर्देशीत करावे , असे देखील सुबोध सावजी यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सुबोध सावजींच्या या विधानाने महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया…सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्रकरण काय?

Sadabhau khot on Rohit Pawar: रोहित पवारांकडून सुनेत्राकाकींचा प्रचार, सदाभाऊ खोतांकडून बोचरी टीका; म्हणाले, ‘पुरोगामीपणाचा खेळ…’

आणखी वाचा

Comments are closed.