Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, खा. सावंत कडाडले
मुंबई : देशाच्या संसद सभागृहात आज महिला आरक्षण लागू करण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन करताना महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, असं म्हटलं. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी महिला आरक्षणास आमचा विरोध नाही, तर मतदार संघ पुनर्रचना म्हणजे delimition या विषयाला आमचा विरोध असल्याचे म्हटले. दरम्यान, संसदेत महिला आरक्षण आणि सुरक्षा विषयावर बोलताना खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात तू तू मै मै झाल्याचं पाहायला मिळालं. दुबेंनी आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) नाव घेतल्याने अरविंद सावंत चांगलेच संतापले होते.
नारी शक्ती विधेयकावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, महिला आरक्षण, महिला आरक्षणाच्या गप्पा मारता, आधी महिला संरक्षणावर चर्चा करा. कुलदीप सेंगर कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे. ब्रिजभूषणसिंह हे महिलांचा सन्मान करणारे आहेत का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत उपस्थित केला. भाजप नेत आणि मंत्री राहिलेल्या कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप असून त्यांना अटकही झाली होती. तर, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. त्यावरुन, अरविंद सावंत यांनी भाजपला डिवचलं. त्यानंतर, खासदार निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं.
सुप्रिया सुळे अन् खासदार सावंत संतापले
जर हे कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषणसिंह यांचा दाखला देतील तर आदित्य ठाकरेंचंही नाव घ्यावं लागेल. कारण, आदित्यनेही हिरोईनला मारलं, आम्ही त्याची चर्चा करू इच्छितो, असे म्हणत नारीशक्ती विधेयकावरील चर्चेत खासदार निशिकांत दुंबेनी थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेत गंभीर आरोप केला. त्यावरुन, शिवसेना खासदार चांगलेच संतापले. तसेच, खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तीव्र शब्दात निशिकांत दुबेंचा विरोध केला. तर, अरविंद सावंत यांनीही तडीपार म्हणत नाव न घेता थेट अमित शाहांकडे इशारा केला.
निशिकांत दुबेंवर कारवाई व्हायला पाहिजे, हे काय आहे? ते आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ शकत नाहीत, असे सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत यांनी म्हटलं. तसेच, आम्ही जर काढलं तर सगळच येईल, मग गोध्रा देखील येईल. मी गुन्हेगारांचं नाव घेतलं जे तुरुंगात गेले होते. जर मला बदनामच करायचं असतं तर, मी तडीपारचं नाव घेऊ का? कोण तडीपार होता? एपस्टीन फाईलचं नाव घेऊ का? तोंड उघडायचं नाही, सगळं बाहेर काढेल. तुमच्यासारख्यांची लाईन आहे इथं.
दरम्यान, महिला आरक्षण देताना नव्याने खासदारांची संख्या 840 नेण्यात येत आहे, पण सध्याच्या 544 खासदारसंख्येमध्येच आरक्षण द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आहे का हिंमत? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.