ठाकरेंच्या सहा खासदारांपैकी एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले; अरविंद सावंत ओम बिरलाना ताड

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर अरविंद सावंत : खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार देऊ नयेत, अशा आशयाचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना लिहून या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

पक्षाच्या खासदारांच्या गटाने आपण स्वतंत्र गट असल्याचं सांगितल्यास किंवा तसा दावा केल्यास अशा प्रकारची कोणतीही विनंती प्राप्त झाल्यास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपल्या कार्यालयासमोर आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका अरविंद सावंत मांडली आहे. घटनात्मक तत्त्वांशी विसंगत असणाऱ्या कोणत्याही कृतीसंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करण्याचा, तसेच दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा अवलंब करण्याचा पक्षाचा अधिकार अबाधित राहील, हे अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिल्या पत्रात नमूद केलं आहे.

Arvind Sawant : अधिकृत नेतृत्वाच्या विरोधात कार्य करणाऱ्या गटांना मान्यता देण्याची कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही

दरम्यानज्या राजकीय पक्षाकडून संबंधित सदस्यांना आपला जनादेश प्राप्त झाल्याचा दावा करता येतो, त्याच पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाच्या विरोधात कार्य करणाऱ्या गटांना मान्यता देण्याची कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. त्यामुळे, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या अशा कोणत्याही मागणीला संसदीय कार्यपद्धतीसंबंधी निर्देशांमध्येही कोणताही आधार मिळत नाही, असेहे या पत्रात म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या चिन्हावर निवडून आलेले काही खासदार लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्या राजकीय पक्षात विलीन होण्यासाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधत आहेत किंवा तसा विचार करत आहेत. अशा वृत्तांमुळे राजकीय पक्ष आणि विधिमंडळीय पक्षांच्या घटनात्मक चौकटीशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका नोंदविणे आवश्यक असल्याचे सांगत अरविंद सावंत यांनी पत्र दिलं आहे.

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा एकच राजकीय पक्ष आहे आणि कायद्याच्या दृष्टीने तो तसाच अस्तित्वात आहे. संसदीय पक्षाचे अस्तित्व पूर्णपणे राजकीय पक्षावर अवलंबून असून तो त्या राजकीय पक्षाचाच एक घटक म्हणून कार्य करतो. लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील स्वतंत्र गट किंवा फुटीर गटाला मान्यता देण्याची अथवा दुसऱ्या राजकीय पक्षात विलिनीकरण करण्याची मागणी ही राजकीय पक्ष आणि विधिमंडळीय पक्षांवरील घटनात्मक चौकटीला धरून नाही. संविधान (एक्याण्णवावी दुरुस्ती) अधिनियम, २००३ ने “फूट” (Split) या तरतुदीला रद्द केल्यानंतर, राजकीय पुनर्रचनेमुळे अपात्रतेपासून सूट मिळण्याचा केवळ एकच मर्यादित अपवाद संविधानात मान्य करण्यात आला आहे, तो म्हणजे दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ४ मध्ये नमूद केलेल्या अर्थाने होणारे विलिनीकरण (Merger). अशा विविध तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून पक्षाची या सगळ्या संबंधीची भूमिका मांडून काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, ज्या राजकीय पक्षाकडून संबंधित सदस्यांना आपला जनादेश प्राप्त झाल्याचा दावा करता येतो, त्याच पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाच्या विरोधात कार्य करणाऱ्या गटांना मान्यता देण्याची कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. त्यामुळे, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या अशा कोणत्याही मागणीला संसदीय कार्यपद्धतीसंबंधी निर्देशांमध्येही कोणताही आधार मिळत नाही.

या परिस्थितीत, मी आदरपूर्वक पुढील विनंत्या करीत आहे :

(i) हे निवेदन अधिकृत नोंदीमध्ये समाविष्ट करण्यात यावे.

(ii) लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला त्याच्या विधिवत अधिकृत नेते आणि पक्षप्रतोद (व्हिप) यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यात यावी. तसेच, पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार किंवा सुविधा देऊ नयेत.

(iii) अशा प्रकारची कोणतीही विनंती प्राप्त झाल्यास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपल्या कार्यालयासमोर आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यावर कोणताही निर्णय घेऊ नये.

याशिवाय, वरील घटनात्मक तत्त्वांशी विसंगत असणाऱ्या कोणत्याही कृतीसंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करण्याचा, तसेच दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा अवलंब करण्याचा पक्षाचा अधिकार अबाधित राहील, हेही नमूद करतो, असेही अरविंद सावंत पत्रात म्हणालेत.

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT MP)
1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

शिंदेना पाठिंबा देणाऱ्या सहाव्या खासदाराचे नेमकं नाव समोर आलं नाही.

Comments are closed.