Summer Fashion : कडक उन्हात कूल दिसण्यासाठी फॉलो करा या फॅशन ट्रिक्स

उन्हाचा तडाखा वाढल्याने कोणते कपडे उन्हाळ्यात घालायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या दिवसात गरम होऊ नये यासाठी कॉटनचे कपडे घालण्याला अधिक पसंती दिली जाते, कारण कॉटन उन्हामुळे येणारा घाम पटकन शोषून घेतो. परंतू या कापडाव्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रकारचे कपडे घालून तुम्ही उन्हाळ्यात कूल दिसू शकता जाणून घेऊयात.

समर फॅशन ट्रिक्स

उन्हाळ्यात सैल कपडे घालावेत, कारण जेवढे कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढे कमी गरम होईल.

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा कारण सुती कापडामध्ये घाम शोषून घेतला जातो.

सुतीऐवजी तुम्ही लिनेन, खादी कापडाचे कपडे घालू शकता. लिनेन कापड हलके असते, जे घाम लवकर शोषून घेते आणि खादी नैसर्गिर धाग्यांपासून बनवले जाते, ज्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

उन्हाळ्यात कपडे निवडताना हलक्या रंगाचे कपडे घालावे. विशेष करून सफेद रंगाचे कपडे घालावेत. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नये.

हेही वाचा – Beauty Tips : लिपस्टिकवरील नंबरचा नेमका अर्थ काय?

सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉनसारखे कपडे या दिवसात अजिबात वापरू नयेत यामुळे घामाचा त्रास होतो.

उन्हाळ्यात भडक रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. यामुळे अधिक गरम होतो.

उन्हातून बाहेर जाताना जीन्स, जाड पॉलिस्टर, नायलॉन किंवा मल्टिलेयर कपडे घालू नयेत, कारण या कपड्यांमध्ये हवा खेळती राहत नाही.

जास्त जड आणि वर्क असलेले कपडे उन्हाळ्यात घालून नये याउलट हलके कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.

हेही वाचा – Facial VS Bleaching: ब्लिच आणि फेशियलमध्ये फरक काय? त्वचेसाठी काय फायदेशीर?

Comments are closed.