Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी संबंधित तीन महत्त्वाच्या विधेयकांवर आज सायंकाळी 4 वाजता लोकसभेत मतदान होणार आहे. संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, सभागृहाच्या कामकाजात आणखी व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या चर्चेदरम्यान, लोकसभेत राहुल गांधी भाषण करतील अशी अपेक्षा आहे, तर अमित शाह सरकारची भूमिका मांडतील. चर्चेनंतर सायंकाळी 4 वाजता मतदान होईल; तत्पूर्वी, गुरुवारी लोकसभेत ही तीन विधेयके सादर करण्यात आली होती.
Comments are closed.