तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार…हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं

हार्दिक पंड्या जसप्रीत बुमराह एमआय वि पीबीकेएस आयपीएल २०२६: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकं केली. मुंबईकडून क्विंटन डीकॉकनं शतकी खेळी केली. मात्र, पंजाबनं विजय मिळवल्यानं त्याचं शतक वाया गेलं. दुसरीकडे पंजाब किंग्सने मुंबईवर विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाब किंग्जच्या अर्शदीप सिंग याला 22 धावा देत 3 विकेट घेतल्यामुळं प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

पंजाबविरुद्धचा सामना हातातून निसटत असताना हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नैराश्यात गेल्याचं दिसून आला. हार्दिक पांड्या अनेक खेळाडूंवर आवाज चढवताना दिसून आला. याचदरम्यान, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना, हार्दिक पांड्या त्याला सूचना देताना आणि क्षेत्ररचना बुमराहच्या मर्जीनुसार नव्हे, तर स्वतःच्या मर्जीनुसार लावताना दिसून आला. जसप्रीत बुमराहने सुरुवातीला एकदा आक्षेप घेतला, मात्र नंतर त्याने कर्णधार हार्दिक पांड्यासमोर माघार घेतली आणि तो अत्यंत निराश दिसून आला.

बुमराहला सलग पाचव्या सामन्यातही विकेट्स मिळवण्यात अपयश- (Jasprit Bumrah IPL 2026)

दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी IPL 2026 मधील कामगिरी अद्यापतरी चांगली ठरत नाहीय. या हंगामात, फलंदाज बुमराहविरुद्ध सावधगिरीने खेळत आहेत आणि आपली विकेट गमावणे टाळत आहेत. याच कारणामुळे, IPL 2026 मध्ये बुमराहला सलग पाचव्या सामन्यातही एकही बळी मिळवता आलेला नाही. बुमराहला बळी मिळवण्यात येत असलेले अपयश हे ‘मुंबई इंडियन्स’च्या खराब कामगिरीमागील एक प्रमुख कारण म्हणूनही समोर आले आहे; कारण यामुळे संघातील इतर गोलंदाजांवरील दबाव वाढला आहे.

मुंबई आणि पंजाबचा सामना कसा राहिला? (MI vs PBKS IPL 2026)

मुंबईला 20 षटकांत 6 बाद 195 धावांवर रोखल्यानंतर पंजाबने 16.3 षटकांमध्येच 3 बाद 198 धावा फटकावल्या, मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला, तर पंजाबने चौथ्या विजयासह सर्वाधिक 9 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. अचूक मारा करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला कोणतीही अडचण आली नाही. अल्लाह घझनफर याने प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली यांना स्वस्तात बाद केले. परंतु, प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 चेंडूंत 139 धावांची भागीदारी करत पंजाबचा विजय स्पष्ट केला, प्रभसिमरनने 23 चेंडूंत, अय्यरने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले.

संबंधित बातमी:

Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: कॅच ऑफ द सीझन…श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.