अभिनेत्री कंगना रणौतने चिराग पासवानसोबतच्या नात्याच्या अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर – Tezzbuzz

कंगना रणौत ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. जीने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट केले. तसेच ती राजकारणात ही कामगिरी निभावत आहे. तसेच चित्रपट संबधित चर्चेत असतेच, तसेच ती तिच्या वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत राहिली आहे. कंगना रणौतने केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या अफवा होत्या आणि त्या अफवांना कंगना रणौत आता पुर्णविराम दिला आहे. या अफवांना तेव्हापासुन सुरुवात झाली जेव्हा ते दोघे कार्यक्रमांदरम्यान एकत्र दिसु लागली.  तर या अफवा काही काळापासून पसरत होत्या. आता या अफवांना उत्तर देत म्हणले आहे, कि यात काही तथ्य नाही. जर अस काही असतं तर आज मुले झाली असती.

मिडियाशी बोलताना ती म्हणाली, अस काही नाही, चिराग माझा मित्र आहे. जेव्हा मी त्याला पाहते, तेव्हा मला एका मित्राची आठवण येते. स्पष्ट सांगायचं तर, आमच्यात कोणतेही प्रेमसंबंध नाहीत. आम्ही एकमेकांना जवळपास. 10 वर्षांपूर्वी ओळखतो.  त्याने माझ्यासोबत त्याचा चित्रपट केला होता. आणि. जर आमच्यात प्रेमसंबंध असते, तर आज आम्हाला मुले झाली असती.” त्यानंतर तिने त्यांच्या नात्याबद्दल अधिक स्पष्टीकरण दिले आणि ते प्रेमसंबंधांपेक्षा अधिक उत्तम जिव्हाळ्याचे नाते असल्याचे वर्णन केले. ती पुढे म्हणाली, “जर मला रोमान्स करायचा असता, तर तो झाला असता. पण तसं काही होत नाहीये.

2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटा दरम्यान कंगना रणौत आणि चिराग (Chirag )पासवान यांची उत्तम मैत्री झाली. तर पासवान यांचा हा पहिला चित्रपट होता. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन तनवीर खान यांनी केले होते. त्यानंतर कंगना रणौत आणि पासवान हे राजकारणात आले. पण चित्रपटामुळे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसतात.

“त्याने माझा हात धरला आणि मला वेगळं स्पर्श केला,” एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याबद्दल डेझी शाहने केला खुलासा

Comments are closed.